होम City News खाजगी हॉस्पिटलला कॉग्रेसची चेतावणी, तीन युवकांना भीतीपोटी जीव गमवावा लागल्याने संताप

खाजगी हॉस्पिटलला कॉग्रेसची चेतावणी, तीन युवकांना भीतीपोटी जीव गमवावा लागल्याने संताप

खाजगी हॉस्पिटलला कॉग्रेसची चेतावणी, तीन युवकांना भीतीपोटी जीव गमवावा लागल्याने संताप


कॉग्रेस शहर उपाध्यक्ष यांनी खाजगी हॉस्पिटलला कुलुप ठोकण्याची दिली चेतावणी


औरंगाबाद,( अशफाक शेख )

एकीकडे कोरोनाला हरवण्यासाठी देशातील प्रत्येक माणूस मानवतेच्या भावनेतून अहोरात्र काम करत आहेत. पण दूसरीकडे वेगळेच चित्र असल्याने उपचाराविना युवकांना जीव गमवावा लागला असल्याने कॉग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तीन ते चार दिवसात किराडपूरा, अल्तमश कॉलनी, रहेमानिया कॉलनी येथील तीन युवकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये महागडे उपचार आणि कोरोनाच्या भीतीपोटी घरातच जीव गमवावा लागल्याने परिसरात रागाचे वातावरण पसरले आहे.

कोरोना व्यतीरीक्त अन्य आजारावर खाजगी दवाखान्यात डॉक्टर उपचार करने तर सोडा हात लावायला तयार नसल्याने जीव स्वस्त झाला आणि डॉक्टरांनी मानवता व कर्तव्य सोडण्याची भावना निर्माण झाली असे दिसत आहे. लाखो रुपये खाजगी हॉस्पिटलमध्ये अगोदरच जमा करायला लावत असल्याने उपचार कसा घ्यायचा सामान्य नागरिकांसमोर प्रश्न असल्याने कॉग्रेसकडून चेतावणी देण्यात आली आहे.

उद्यापासून लॉकडाऊनची पर्वा न करता ज्या रुग्णांना पैशाविना उपचार मिळणार नाही कॉग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून खाजगी दवाखान्यांना कुलूप ठोकणार आहे. असा इशारा कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष इब्राहिम पटेल यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी डॉक्टरांना पिपिई कीट देण्याचे मान्य केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत मोफत कोरोनाचा उपचार करावा नाही तर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. किराडपूरा येथील समाजसेवक अब्दुल अजीम अ.रशीद, वय 41, अल्तमश कॉलनी येथील मुस्तफा खान हबीब खान, वय 42, रहेमानिया कॉलनी येथील शेख सगीर शेख जब्बार, वय 44 यांनी महागड्या उपचारामुळे उपचार न घेतल्याने ह्रदयविकाराने निधन झाले याला कोण जवाबदार आहे याचे उत्तर द्यावे. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. कोरोनाची भीती आणि दूस-या आजारावर सुध्दा उपचार मिळत नसल्याने तीघांचा बळी गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अशा प्रकारे जीव जावू नये म्हणून खाजगी हॉस्पिटल, छोटे दवाखान्यात डॉक्टरांनी तपासणी करावी. अशी मागणी केली आहे. कोरोना योध्दांचे शहर आणि देश गुणगान गात आहे. पण अशा घटनांनी मन व्यथित झाल्याने सामान्य नागरिकांच्या मनात वेदना होत आहे. गरीबांना मरणयातना भोगावे लागत आहे असे पटेल यांनी सांगितले.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें

Must Read

गहना खरीदी के बहाने दुकानदारों को झांसा देकर चोरी करने वाली महिला गैंग गिरफ्तार,

गहना खरीदी के बहाने दुकानदारों को झांसा देकर चोरी करने वाली महिला गैंग गिरफ्तार, लाइव तश्वीर सीसीटीवी में हुई...

कार्ड क्लोनिंग कर एटीएम से पैसे निकालने वाले गिरोह को किया गिरफ्तार

कार्ड क्लोनिंग कर एटीएम से पैसे निकालने वाले गिरोह को किया गिरफ्तार इस गिरोह का मास्टरमाइंड बैंक मैनेजर था

दूध मिलावट करने वाले आरोपी को किया गिरफ्तार

दूध मिलावट करने वाले आरोपी को किया गिरफ्तार क्राइम ब्रांच और एफडीए ने मिलकर की कारवाई

ऑनलाइन के जरिए ड्रग्स बेचने वालों को ठाणे क्राइम ब्रांच ने पकड़ा और करोड़ो की ड्रग्स बरामद की

ठाणे क्राइम ब्रांच की बड़ी कार्यवाही, 1करोड़ 50लाख की LSD ड्रग्स बरामद, 3 ड्रग्स पेड़लर्स गिरफ्तार।

हथियारों के जखीरा की मुम्बई में किसे की जानी थी डिलेवरी..?

हथियारों के जखीरा की मुम्बई में किसे की जानी थी डिलेवरी MP में हथियार की फैक्ट्री, मुम्बई में डिलेवरी